अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचंही पाठबळ

शिवसेनेकडून या निवडणुकीत जो उमेदवार उभा राहिल त्यालाच काँग्रेस पाठिंबा देईल. आणि उमेदवार निवडून यावा यासाठी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील''. असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मित निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मदारांचे पद अनेक दिवस रिक्त होते. म्हणून आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान पोटनिवडणूक लागल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

11 मे 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 1997मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले होते. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर पुढच्याच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते. मात्र, आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तिथेच 11 मे 2022 रोजी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

हे ही वाचा – नाना पटोलेंसह तुमच्या लोकांना सल्ले द्या; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, ”विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. अडीच वर्षे राज्यात या महाविकास आघाडीचे सरकार होते. सोबतच या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णयसुद्धा घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाच्या काळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. आणि राज्यात नवे सरकार स्थापन केले”.

हे ही वाचा – शिंदे – ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्या मुंबईच्या ट्राफिक नियमात बदल; हे प्रमुख रस्ते राहणार बंद

”महाविकास आघाडी सरकार फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेनेकडून या निवडणुकीत जो उमेदवार उभा राहिल त्यालाच काँग्रेस पाठिंबा देईल. आणि उमेदवार निवडून यावा यासाठी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील”. असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सोबतच काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे एका अर्थी शिवसेनेची बाजू मजबूत झाली आहे. तर आता याच निवडणुकीसाठी भाजप सुद्धा त्यांचा उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा मतदार संघातील या पोटनिवडणूकीत अटीतटीची लढत होणार आहे. दरम्यान या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.