एप्रिल महिन्यात १४ दिवस बँक बंद राहणार; जरूरी काम करुन घ्या

Bank Holiday
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र या दरम्यान अत्यावश्यक सेवा सरकारने सुरु ठेवल्या होत्या. या सेवांमध्ये बँकादेखील सामील होत्या. २५ तारखेपासून बँका सतत चालू होत्या. मात्र एप्रिल महिन्यात वेगळे चित्र दिसणार आहे. या महिन्यात बँकाना तब्बल १४ दिवसांची सुट्टी आहे. या १४ दिवसात भारतातील राज्यांमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे बँकाशी निगडीत तुमची काही कामे असतील तर ती लगेच करुन घ्या, पण सोशल डिस्टसिंग पाळून.

April bank closed

April bank closed 2

एप्रिल महिन्यात दहा बँकांचे मर्जर झाल्यामुळे आता या बँकाची संख्या ४ वर आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकाची संख्या २०१७ साली २७ होती जी आता १२ वर आली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलनीकरण पंजाब नॅशनल बँकेत होणार आहे. कॅनरा बँकेचे सिंडिकेट बँकेत विलनीकरण केले जाणरा आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितले आहे की, राष्ट्रीयकृत बँकांचे विलनीकरण झाल्यामुळे भारतातील बँकिंग क्षेत्राचे एक नवे युग सुरु होईल. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या संख्येने कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. तसेच आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देखील देऊ शकते.