Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र हरिश्चंद्रगड अभयारण्यात चार बिबटे, एक रानगवा

हरिश्चंद्रगड अभयारण्यात चार बिबटे, एक रानगवा

Subscribe

अकोले : तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात या वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव विभागाकडून प्राणी व पक्षांची प्रगणना करण्यात आली. त्यात या भागात आजही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी व पक्षांचा अधिवास टिकून असल्याचे दिलासादायक बाब स्पष्ट झाली. विशेष म्हणजे या प्रगणनेत अवघे चार बिबटे व १ रानगव्याची नोंद झाली.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणालगत असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही वन्यजीव विभागाकडून बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्षांची प्रगणना करण्यात आली.

या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांच्या परिसराचा वापर केला जातो. त्यासाठी वन्यप्राण्यांच्या निरिक्षणासाठी पाणवठ्यालगतच झाडांवर निरीक्षण मनोरे उभारले जातात. यंदा वन्यप्राण्यांच्या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे, अहमदनगर व नाशिक विभागातून वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता. प्रगणनेसाठी कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी या परिसरातील पाणवठ्यांवर निरीक्षणासाठी मनोरे उभारण्यात आले होते. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या स्वच्छ प्रकाशात पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे छायचित्र घेण्यात येऊन नोंदणी करण्यात आली.

- Advertisement -

वानर, माकडांची संख्याही मोठीः अभयारण्यामध्ये बिबट्यांचा सहवास अल्पप्रमाणात दिसुन येत असुन, नोंदणीत केवळ ४ बिबट्यांची नोंद झाली. १ रानगवाही गेल्या दोन-तीन वर्षापासुन अभारण्यात मुक्कामास असल्याचे दिसून आहे. प्रगणेनत वानरांची संख्या २८१, तर माकडांची संख्या २१३ आढळून आली. रानडुकरांचाही मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याचे स्पष्ट झाले.

रतनवाडी परिसरात नीलगाय व सांबर टिकुन असुन शेकरुही वास्तव्यास आहेत. पक्षांचांही अभयारण्यात मोठ्याप्रमाणात वावर असल्याचे प्रगनणेवरुन लक्षात येत असुन चिमणी मात्र अभयारण्यातुन गायब झाली असल्याचे लक्षात येते. या वन्यजीवांच्या प्रगणनेसाठी वनसंरक्षक अधिकारी यशवंत केसकर, वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामण, वनपाल रवींद्र सोनार, भाऊसाहेब मुठे, तसेच वनकर्मचारी चंद्रकांत तळपाडे, महिंद्रा पाटील, सरोदे, संजय गिते, गुलाब दिवे यांच्यासह कर्मचार्‍यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

- Advertisement -

 

या प्राणी-पक्ष्यांची नोंद

भंडारदर्‍याच्या अभयारण्यात वानर, खार, ससा, रानमांजर, तरस, माकड, मुंगुस, रानडुक्कर, भेकर, कोल्हा, रानगवा, नीलगाय, सांबर, शेकरू व बिबट्या हे प्राणी दिसुन आले. पक्षांमध्ये बगळा, लावरी, खंड्या, साळुंकी, कुंभार कुकडा, होला, घुबड, रानकोंबडी, रानतांबी, मोर, रानकोंबडा, कोकरुस, फेसा, पाणकोंबडी, केगई इ. पक्षी आढळून आले.

- Advertisment -