घरक्राइमकणकवली हादरली ; सतीश सावंत यांच्या खंदे समर्थकांवर भर रस्त्यात चाकूने वार

कणकवली हादरली ; सतीश सावंत यांच्या खंदे समर्थकांवर भर रस्त्यात चाकूने वार

Subscribe

जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्या चा आरोप 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज शनिवारी १८ डिसेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.गजबजलेल्या नरडवे रोडवर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला आहे.हल्लेखोरांनी प्रथम इनोव्हा कारने पाठीमागून ठोकर देत अपघात केला.मोटरसायकल वरून परब खाली कोसळताच संतोष परब यांच्यावर धारधार सुरीने हल्ला करण्यात आला.या घेतनेने कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कणकवली येथून संतोष परब येथून शिवशक्ती नगर येथील रूमवर जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.त्यानंतर तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत चौकशी केली.संतोष परब यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

घटनेनंतर शेकडो कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.यावेळी हॉस्पिटलमध्ये संतोष परब माहीती देताना म्हणाले की संशयित आरोपी हे दोघेजण होते. सिल्व्हर कलरची इनोव्हा कार नरडवे रोड वरून कनेडीच्या दिशेने निघाली आहे .त्याच्या ऑफ वाईट शर्ट होते. जखमी संतोष परब यांच्या छातीवर वार करण्यात आला आहे. जखम १० ते १२ इंच लांबीची असून,त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

कणकवलीत शहरात तणावाचे वातावरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.गजबजलेल्या नरडवे रोड वर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.नरडवे नाका श्रीधर नाईक चौकात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.अपर पोलीस निरीक्षक नितीन बगाडे तसेच कणकवली विभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष परब यांचा जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सातारकरांच्या चिंतेत वाढ! फलटणमध्ये ३ रुग्ण Omicron पॉझिटिव्ह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -