घरताज्या घडामोडीकोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठाण्यात अनधिकृत बांधकामांना उधाण!

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठाण्यात अनधिकृत बांधकामांना उधाण!

Subscribe

'कोरोना' संसर्ग रोखण्याच्या कार्यात महापालिका यंत्रणा गुंतली असताना ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांना उधाण आले आहे.

‘कोरोना’ संसर्ग रोखण्याच्या कार्यात महापालिका यंत्रणा गुंतली असताना ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांना उधाण आले आहे. गेल्या चार महिन्यांच्या काळात शेकडो अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून महापालिकेने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

सर्वेक्षणाची नारायण पवार यांची मागणी

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजना करण्यात पालिका यंत्रणा गुंतली गेली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्याबरोबरच कारवाई देखील करण्यात आलेली नाही. या काळात सर्वोच्च प्राधान्य कोरोनासाठी देण्यात आले होते. त्यामुळे त्याचा फायदा भूमाफिया आणि अनधिकृत बांधकामे करणाऱ्या तथाकथित बिल्डरांनी घेतला. परिणामी, शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्याबरोबरच ठोस कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत शहरावर कोरोनाचे अद्यापि सावट आहे. मात्र, आता `मिशन बिगिन अगेन’ सुरू झाले असल्यामुळे कोरोनाबरोबरच शहराच्या अन्य मुद्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने भूमाफियांवर वचक न ठेवल्यास शहराचा बोजवारा उडण्याची भीती आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत ठाणेकरांना भविष्यात परवडणार नाही. बहुसंख्य अनधिकृत इमारतींमध्ये सामान्य माणसाची फसवणूक होते. तो आयुष्याची पुंजी देऊन घर विकत घेतो. कालांतराने महापालिकेने कारवाई केल्यावर तो उद्ध्वस्त होतो. याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

लकी कंपाऊंडसारखी दुर्घटना परवडणार नाही

मुंब्रा येथे २०१३ मध्ये लकी कंपाऊंडमधील अनधिकृत इमारत कोसळून ७४ जणांचा बळी गेला होता. त्यात महापालिकेच्या उपायुक्तांसह अनेक कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने ठाणे महापालिकेची बदनामी होऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. सद्यस्थितीत वेगाने उभारली जाणारी कच्च्या बांधकामांची अनधिकृत इमारत कोसळल्यास मोठी हानी होईल. त्यामुळे लकी कंपाऊंडसारखी दुर्घटना पुन्हा टाळण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणात गणपतीसाठी रेल्वेगाडया प्रकरण,महाराष्ट्र सरकारकडून अलार्म चैनपुलिंग, खापर रेल्वेवरच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -