घरCORONA UPDATEराज्यात १ लाख ४७ हजार लहान मुलांना कोरोना; मुंबईत सर्वाधिक मुले पॉझिटिव्ह

राज्यात १ लाख ४७ हजार लहान मुलांना कोरोना; मुंबईत सर्वाधिक मुले पॉझिटिव्ह

Subscribe

देशासह महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या जोरदार फटका बसला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. कोरोनाने लहान मुलांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. राज्यात दिवसागणीक सुमारे पाचशे लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. यात मुंबईतील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १० वर्षे वयोगटातील १ लाख ४७ हजार ४२० लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ३ लाख ३३ हजार ९२६ लहान मुले आणि तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लहान मुलांना झालेल्या कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. बहुतांश मुलांना कोरोनाची लागण ही त्यांच्या पालकांकडून झाली आहे. कारण बरेच कोरोनाबाधित हे घरीच क्वारंटाईन होत आहेत. यामुळे त्यांच्यापासून त्यांच्या मुलांना कोरोनाची लागण होत आहे, असं KEM चे डॉक्टर मुकेश अगरवाल यांनी सांगितलं. यात दिलासा देणारी बाब म्हणजे लहान मुले पॉझिटिव्ह होत असली तरी ती बहुतांश निरोगी असल्याकारणाने बरीही होत आहेत.

- Advertisement -

वाडिया रुग्णालयात मार्च एप्रिल दरम्यान ५ मुलांचा मृत्यू

परळ येथील वाडिया रुग्णालयात मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान ५ कोरोनाबाधित मुले दगावली. तर २०२० मध्ये तीन मुलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसंच, मे आणि जून २०२० मध्ये वाडिया रुग्णालयातील ७६ मुलांना कोरोनाची लागण झाली होती. तर मार्च-एप्रिलमध्ये १०३ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

नायर रुग्णालयात ४३ मुलांना दाखल करण्यात आलं

एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाबाधित ४३ मुलांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यामध्ये ४ मुले दगावली. मृत्यू झालेल्यांपैकी ९ महिन्यांच्या एका मुलासह तीन नवजात बालकांचा समावेश होता.

- Advertisement -

हाजीअली येथील SRCC बाल रुग्णालयातही कोरोनाबाधित लहान मुलांना उपचारासाठी दाखल केलं जात आहे. गेल्या मार्चमध्ये दुर्दैवाने एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. तर सायन रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागात रोज ४ ते ५ कोरोनाबाधित लहान मुलांना दाखल केलं जात आहे. याची माहिती तिथल्या बालरोगतज्ज्ञांनी दिली. दाखल होणाऱ्या बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळत आहेत. त्यामुळे लहान मुलं उपचारानंतर बरीही होत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -