घरताज्या घडामोडीउभी राहण्यापूर्वी ‘ती’च्या मार्गात अडसर

उभी राहण्यापूर्वी ‘ती’च्या मार्गात अडसर

Subscribe

पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही ‘ती’ बस उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. ‘ती’च्यासाठी मुंबई महापालिकेनेही अथक प्रयत्न घेतले होते. परंतु ‘ती’बस उभी राहण्यापूर्वीच तिला विरोध होवू लागला आहे.

पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही ‘ती’ बस उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. ‘ती’च्यासाठी मुंबई महापालिकेनेही अथक प्रयत्न घेतले होते. परंतु ‘ती’उभी राहण्यापूर्वीच त्याला विरोध होवू लागला आहे. त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह येथील विल्सन जिमखाना येथील सर्व्हींस रोडवर महिलांच्या प्रसाधनगृहाची ‘ती’बस उभी करण्यास पुरातन वास्तू विभागाने परवानगी नाकारल्याने तिच्या मार्गातच अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ‘ती’ला अन्य ठिकाणी स्थिरस्थावर करण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्‍यांची प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे.

महिलांसाठी सुसज्ज आणि वातानुकूलित असे प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी पुण्यामध्ये ज्याप्रकारे महिलांसाठीचा प्रसाधनगृह जुन्या बसमध्ये उभारून याबाबतची सेवा दिली आहे, त्याप्रकारे मुंबईतील अशाप्रकारे बसमध्ये महिलांसाठी ‘सीएसआर’ निधीतून प्रसाधनगृह उभारण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ही बस प्रायोगिक तत्वावर विल्सन जिमखाना येथील सर्व्हीस रोडवर उभी करण्यात येणार होती. परंतु हा परिसर पुरातन वास्तू विभागात येत असल्याने याबाबतच्या समितीने याठिकाणी ही प्रसाधनगृहाची ही बस उभारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महापालिकेने आता अन्य जागांचा शोध सुरु केला असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

प्रसाधनगृहाच्या या ‘ती’ बसमध्ये वातानुकुलिन यंत्रणा बसवण्यात येत असून वायफाय सेवा तसेच टिव्ही, डॉक्टरचीही सुविधा असणार आहे. याशिवाय महिलांना स्तनपानासाठी जागाही असेल. मरीन ड्राईव्ह येथे ही बस उभी केली असती तरी यातील मलवाहिनी ही जवळच्या मलवाहिन्यांमध्ये जोडली जाणार होती. परंतु आता ‘ती’ परवानगीच नाकारल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिस जिमखान्यासमोरील ज्या सर्व्हिस रोडवर वाहने उभी असतात, तिथे ही महिलांसाठीची ‘ती’ बस उभी केली जाणार होती. परंतु त्या बसला पुरातन वास्तू समितीने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अन्य जागेचा शोध सुरु आहे. मात्र, याबाबतची पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -