नागपुरच्या खासगी शाळेत तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

नागपुरमधील एका खासगी शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

CoronaVirus: Corona is spread by a droplet in the runny nose; Shocking revelation from research

नागपुरमधील एका खासगी शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, यामुळे संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

३८ विद्यार्थी कोरोनाबाधित

नागपुरमधील हिंगणा रोड येथील जयताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील ३८ विद्यार्थी कोरोनाबाधित निघाले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या शाळेचे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याची माहिती दिली आहे. संबंधित शाळेतील मुलांची १५ जुलैला आरटीपीसीआर करण्यात आली. त्यानंतर १६ जुलैला नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

नागपूरमध्ये रविवारी दिवसभरात तब्बल २६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती मिळते. त्यामुळे नागपुर प्रशासनही सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता प्रशासन कामाला लागले आहे.

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर राय इंग्लिश स्कूल या शाळेचे संचालक डॉ. एम. एम. राय यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळेतील शिक्षकांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांची आरटीपीसीआर करायला सांगण्यात येणार आहे. तसेच, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यावरच शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, त्यांच्या अभ्यासाचे नुकसानही होऊ देणार नाही.

नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना

एकिकडे राज्यभरात पावसामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आज राज्यात 2 हजार 186 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत रविवारी सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात तीन कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 55 हजार 840 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.96 टक्के इतके झाले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन-२०० आता नजर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांवर