आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, नांदेड अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. (In Nanded leader Mangesh Kadam and his wife Jyoti Kadam and Congress activists joined the Shiv Sena which is considered a big shock to Ashok Chavan )
नांदेडमध्ये नेते मंगेश कदम त्यांची पत्नी ज्योती कदम, अँड धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह काँग्रेसमध्ये शेकडो कार्यकर्त्ये शिवसेनेत दाखल झाल्याने अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मंगेश कदम नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेसकडून सहा वेळा नगरसेवक राहिले आहेत. तर ज्योती कदम माजी समिती सदस्य आहेत.
कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करताना कदम यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामानं प्रभावित झालो असून काँग्रेसने आपला वापर करून घेतला आणि त्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष केल्यानेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे.
(हेही वाचा: सरकार अडचणीत आले की संघ असा धावून येतो…, आरक्षणावरून काँग्रेसचे शरसंधान )
याआधी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही केला होता प्रवेश
काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी, कुणाल माने, गंगा माने, बब्बू खान, वाजीद कुरेशी या पाच माजी नगरसेवकांसह सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य भास्कर शेट्टी यांनी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते आणि माजी नगरसेविका समृद्धी काते, अशा आठ जणांनी 26 ऑगस्टला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाहीर प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते मंगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.