घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये मध्यरात्री टोळक्यांचा उच्छाद, घराचा दरवाजा तोडून केला कोयत्याने हल्ला!

नाशिकमध्ये मध्यरात्री टोळक्यांचा उच्छाद, घराचा दरवाजा तोडून केला कोयत्याने हल्ला!

Subscribe

हल्ल्यानंतर या टोळक्याने परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने सुंदरनगर भागात उभ्या असलेल्या चार चाकी, मोटार सायकल व रिक्षांची तोडफोड केली.

देवळाली गावात मध्यरात्री टोळक्याने घराचा दरवाजा तोडून लाठी कोयत्यांनी हल्ला करुन एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या टोळक्याने परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याने मोठी घबराहट पसरली होती,  पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, देवळाली गावातील सुंदरनगर भागात राहणा-या प्रमिला बापू कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीत शनिवारी पहाटेच्या सुमारास जय उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे, साहील आवारे, साहिल उर्फ पोशा, सत्तू रावत, राहूल उज्जैनवाल, अनिकेत गिते, इंद्या वाघ, समीर राठोड, अमन वर्मा, वाल्मीक घोरपडे, मंगल घोरपडे, वैभव, चिन्या, व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांनी दरवाजा कोयत्यांनी तोडून घरात प्रवेश केला, प्रमिला यांचा मुलगा जनार्दन कुमावत याच्यावर कोयत्याने हल्ला केला, डोक्यात कोयता मारला परंतू जनार्दनने तो हुकवल्याने हातावर गंभीर जखम झाली,  इतरांनी महिला व इतर मुलांना कोयत्याचा धाक दाखवत दूर ठेवले, जनार्दनला मारहाणीत खांद्यालाही कोयत्याने जखम झाली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर या टोळक्याने परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने सुंदरनगर भागात उभ्या असलेल्या चार चाकी, मोटार सायकल व रिक्षांची तोडफोड केली, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणे प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहकले यांनी सांगितले की,  मागील भांडणाची कुरापत काढून वाद झाला आहे,  मारुती घोरपडे व इतरांवर या अगोदरही गंभीर गुन्हे दाखल आहेत, कुमावत यांच्या घरात जाऊन तोडफोड करत मारहाण केली आहे, एकुण तेरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप पर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.


हे ही वाचा – खुशखबर! सोनं स्वस्त झालं, आजचा मुंबईतील भाव ‘इथे’ वाचा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -