घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महानगरपालिकेत मतदार याद्यांसाठी 'रात्रीस खेळ चाले'

नाशिक महानगरपालिकेत मतदार याद्यांसाठी ‘रात्रीस खेळ चाले’

Subscribe

नाशिक : महापालिकेत मतदार याद्या तयार करण्यासाठी २१ जुलैची मुदत दिलेली असतानाही हरकतींची संख्या इतकी मोठी आहे की, कर्मचार्‍यांना अक्षरश: मध्यरात्रीपर्यंत महापालिकेच्या मुख्यालयात काम करावे लागत आहे. ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने रात्री ११ वाजेच्या सुमारास महापालिकेच्या मुख्यालयास भेट दिली असता तेथे मतदार याद्यांवर काम सुरु होते.

महापालिका निवडणुकीसाठी ४४ प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला असून, राज्यातील तिसर्‍या क्रमांकाच्या हरकती पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. विक्रमी हरकतींमध्ये सर्वाधिक हरकती या मतदारांच्या प्रभागांच्या अदलाबदली होती.सिडकोत सर्वाधिक २४३३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर नाशिक पश्चिम मधून ४६ अशा सर्वात कमी हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आयुक्त रमेश पवार यांनी निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले सर्व विभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, यादी प्रमुख, यादी सहाय्यक, आदी सुमारे ३०० अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक घेत हरकतींच्या चौकशीसाठी ४४ प्रभागांसाठी ४४ पथके स्थापन केली होती. हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, पंचनाम्याची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण होऊन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.परंतु, ९ जुलै पर्यत हरकतींची चौकशी करणे शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.त्यामुळे महापालिकेच्या पथकांनी भर पावसात ३,८४७ हरकतींचा चौकशी पूर्ण करत, मंगळवारी निवडणूक उपायुक्तांकडे सादर केला होता.परंतु,या चौकशी अहवालाची छाननी करून त्यांचा कंट्रोल चार्ट वेळेत बनवने शक्य नसल्याने आयोगाने नाशिक महापालिकेला अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या मतदार याद्या आता २१ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहेत.

- Advertisement -

उर्वरित कर्मचारी सकाळी ७ वाजताच कामावर-

मतदार याद्यांच्या कामासाठी कर्मचार्‍यांकडून दिवसभर तर काम केलेच जाते. शिवाय रात्री-अपरात्रीही कामाला बोलवले जाते. सोमवारी (दि. १८) आपलं महानगर प्रतिनिधीने रात्रीच्या वेळी राजीवगांधी भवन येथे फेरफटका मारला असता उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्याकक्षाबाहेर अनेक कर्मचारी दिसून आले. यातील काहींना मंगळवारी सकाळी ७ वाजताच कामावर बोलवण्यात आले आहेे. उर्वरित कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत होते.

हरकती अधिक असल्याने अधिक वेळ काम करावे लागत होते. कालपर्यंत चौकशीचे काम झाले. आता सर्वांचे कंट्रोल चार्ट तयार करावे लागत आहेत. डाटा एन्ट्री करताना आकडे, अनुक्रमांक हे समजून घेऊन त्यांचा ताळमेळ लावावा लागतो. कंट्रोल चार्ट अंतीम झाल्याशिवाय आम्हाला मतदार यादी तयार करता येत नाही. रात्री कंट्रोल रुमवर केवळ कोअर कमिटीच्या कर्मचार्‍यांना कामावर बोलवण्यात आले आहे. उर्वरित कर्मचारी दिवसभर काम करतात. : मनोज घोडे पाटील, उपायुक्त, प्रशासन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -