घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादेत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

Subscribe

औरंगाबादमध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे.

औरंगाबादमध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. (In NCP leader son wedding 700 people poisoned at Aurangabad)

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कदिर मौलाना (Abdul Qadeer Moulana) यांच्या मुलाचा काल लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या व मळमळीचा त्रास झाल. अचानक पाहुण्यांना असे व्हायला लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, या लग्नसोहळ्यातील पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.

काही लोक स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर एकानंतर एक अशा अनेकांना हा त्रास झाल्याचे उघड झाले. जवळपास 700 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती सध्या ठीक असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह बुधवार 4 जानेवारी रोजी पार पडला. विवाह पार पडल्यानंतर रात्री पाहुण्यासाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले. हाच गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतःहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र याचे प्रमाण वाढताच हे मेजवानतील जेवणातून झाल्याचे समोर आले.

याबाबत कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्रास होत होता. मात्र कोणेही गंभीर नाही. तसेच सर्वांना रात्रीची तपासून डॉक्टरांनी तात्काळ सुट्टी दिली आहे. त्यामुळे कोणेही गंभीर नाहीत. तसेच हा सर्व प्रकार कदीर मौलाना यांच्या घरी घडला नसून, जेवणाचा कार्यक्रम मुलीकडे होता. तर कदीर मौलाना यांच्याघरी होणारा कार्यक्रम आज आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे, कदीर मौलाना यांच्या समर्थकाने प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध चार्जशिट दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -