घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री; खासदार राणांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री; खासदार राणांचे वक्तव्य

Subscribe

'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत', असे वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले. 'राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले, तिथ तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत', असेही नवनीत राणा यांनी सांगितले.

‘देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत’, असे वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले. ‘राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले, तिथ तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत’, असेही नवनीत राणा यांनी सांगितले. अमरावती येथील एका सभेत नवनीत राणा बोलत होत्या. (In Our Mind Devendra Fadnavis Is The Chief Minister For Us Mp Navneet Rana Big Statement)

“देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनात आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. तुम्हीच महाराष्ट्राचा विकास करू शकता असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत. गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती आपण पाहिला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभं राहिले पाहिजे”, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

- Advertisement -

“आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामं करता ते पाहून आमच्या मनात आम्हाला हेच वाटतं की तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात”, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सुपर सीएम किंवा दुसरे मुख्यमंत्री असा केला जातो आहे. शिवाय, अनेकदा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आपल्या राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आणि दुसरे स्पेशल मुख्यमंत्री असे सांगतात. अशातच आता खासदार नवनीत राणा यांनी आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात असे म्हटले. त्यामुळे नवनीत राणांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गावर देशातील सर्वात मोठ्या गर्डरचे लॉन्चिंग; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -