घरताज्या घडामोडीपुण्यात 400 मनसैनिकांनी ठोकला पक्षाला राम-राम; राज ठाकरेंसमोर मोठं आव्हान

पुण्यात 400 मनसैनिकांनी ठोकला पक्षाला राम-राम; राज ठाकरेंसमोर मोठं आव्हान

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यातून मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी राजिनामा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यातून मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी राजिनामा दिला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निलेश माझिरे आणि 400 पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. (In Pune 400 MNS Workers Gave resignation mns chief raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूकांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील ठिकठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तसेच, पक्षाला बळकटी देण्यासाठी काम करत आहेत. अशातच पुण्यातील 400 पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामा दिला. निलेश माझिरे यांच्यासह जवळपास 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केल्यामुळे पक्षाची ताकदज पुण्यात कमी झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पुण्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकचे लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी आणि आता कार्यकर्त्यांचे राजिनामा सत्र यावरून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी देखी पुण्यात मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी अचानकपणे वसंत मोरे यांच्याकडून पदभार काढून घेतल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – अरेच्चा! खुद्द एकनाथ शिंदेच म्हणतात, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -