घरताज्या घडामोडीरायगडमध्ये आढळला तरंगता बॉम्ब; पोलीस तपासात डमी असल्याचे निष्पन्न

रायगडमध्ये आढळला तरंगता बॉम्ब; पोलीस तपासात डमी असल्याचे निष्पन्न

Subscribe

रायगडमधील पेण शहरानजीक असलेल्या भोगावती नदीत तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बसदृष्य वस्तू असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर संबंधित स्थानकांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची माहिती पोलिसांना दिली.

रायगडमधील पेण शहरानजीक असलेल्या भोगावती नदीत तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बसदृष्य वस्तू असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संबंधित स्थानकांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास केले असता, तो डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. (In Raigad District Anti Bomb Squad Disarms Gelatin Sticks Found Floating On The Bhogavati River In Penn)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगडमधील भोगावती नदीत तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू स्थानिकांना आढळली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर यासंदर्भात माहिती रायगड बॉम्बशोधक पथकाला पोलिसांनी दिली तसेच, त्यांना पाचारण केले.

- Advertisement -

रायगड बॉम्बशोधक पथकाने या बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास सुरू केला. तब्बल 4 तास बॉम्बशोधक पथक बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास करत होते. मात्र, अखेर हा बॉम्ब निकामी असल्याचे निष्पन्न झाले. या डमी बॉम्बमध्ये वायर आणि घड्याळाचाही वापर करण्यात आला होता.

बॉम्बशोधक पथकाने सदर डमी बॉम्ब निकामी केल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या परिसरात आणखी काही संशयास्पद वस्तू आहे का, याबाबत पोलिसांकडून आज दिवसभर शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, रायगडच्या भोगावती नदीत ही बॉम्बसदृष्य वस्तू आली कशी याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तसेच, हा डमी बॉम्ब नेमका कोणी तयार केला आणि यामागे त्याचा काय उद्देश होता, याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत.


हेही वाचा – शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढून घेताहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -