साताऱ्यात कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 6 जखमी

साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे 5:30 वाजाताच्या सुमारास खंबाटकी बोगद्याजवळ हा अपघात झाला.

साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे 5:30 वाजाताच्या सुमारास खंबाटकी बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर, 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (in satara car accident near khambatki tunnel two dead six injured)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ एनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने जात असताना इनोव्हा कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. जखमींवर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालाकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे

याआधी पुण्यामध्ये शनिवार (28 जानेवारी 2023) रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पीएमपी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोर घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.


हेही वाचा – वरळीतील ‘हा’ माजी नगरसेवक जाणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का