Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी साताऱ्यात डॉक्टरांची युवकाला मारहाण, चिठ्ठी लिहित उचललं टोकाचं पाऊल

साताऱ्यात डॉक्टरांची युवकाला मारहाण, चिठ्ठी लिहित उचललं टोकाचं पाऊल

Subscribe

साताऱ्यात डॉक्टरांनी एका युवकाला मारहाण केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. डॉक्टरांनी मारहाण केल्यानंतर युवकानं चिठ्ठी लिहित टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे संबंधित डाक्टरांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी मृत युवकांच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत चंद्रकांत बोतालजी, असं मृत युवकाचं नाव आहे. हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रान्झेक्शन केले. त्यानंतर जबरदस्तीने नोटरी करून घेत डॉक्टरांनी घर नावावर करून घेतलं, असा आरोप युवकानं या चिठ्ठीच्या माध्यमातून केला आहे. हे सगळं करत असताना या डॉक्टरांनी त्याला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

संबंधित डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ आणि डॉ. गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी पोलीस करत आहेत.

२४ मे रोजी बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली होती. धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.


- Advertisement -

हेही वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! राज्यात यंदा चांगला मान्सून; हवामान विभागाचा अंदाज


 

- Advertisment -