घरताज्या घडामोडीकिशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश

किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश

Subscribe

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कथीत कथीत एसआरए घोटाळा प्रकरणी पुढील निर्देशांपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची सुनावणीही 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कथीत कथीत एसआरए घोटाळा प्रकरणी पुढील निर्देशांपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची सुनावणीही 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. (In Sra Scam Mumbai High Court Relief To Kishori Pednekar)

कथीत एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. शिवाय, मुंबई पोलिसांनी तुर्तास पेडणेकर यांच्यावर कारवाई करु नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

किशोरी पेडणेकरांवरील आरोप काय?

किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप झाला. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेत वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला. याच आरोपाप्रकरणी आता किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत ‘किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात झोपडपट्टीवासीयांची घरे काबीज करण्याच्या आरोपाखाली ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर लादण्यात आलेले आरोप फेटाळून लावला आहे. “दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप केला जातोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. सत्य सर्वांना कळेल. आग नाही पण धूर काढण्याची पद्धत यांनी अवलंबली आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह गेल्यानंतर गेल्यानंतर सगळे आरोप थांबले आहेत. त्यामुळे लोकांना सगळं माहिती आहे, असे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी याआधी दिलेले आहे.


हेही वाचा – मला गुंड बोलण्याचा अधिकार कोणी दिला? राजा ठाकूर राऊतांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -