उद्धव ठाकरेंची ठाण्यात एन्ट्री अन् शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅक?

ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम ही शिवसेनेची शाखा हायजॅक करण्याचा शिंदे गटाकडू प्रयत्न केला जात आहे. तसेच, शिंदे गटाने आनंद आश्रम या शाखेवर बाळासाहेबांची शिवसेना असा फलकही उभारला आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम ही शिवसेनेची शाखा हायजॅक करण्याचा शिंदे गटाकडू प्रयत्न केला जात आहे. तसेच, शिंदे गटाने आनंद आश्रम या शाखेवर बाळासाहेबांची शिवसेना असा फलकही उभारला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात नव्या वादाची ठिणगी उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (In Tembhi naka Attempt To Hijack Anand Dighe Anand Ashram Shiv Sena Branch By Shinde Group)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडून ठाण्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या शाखेवर बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावण्यात आला. विशेष म्हणजे हा फलक उद्धव ठाकरे ठाण्यात येणार असल्यामुळेच लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथे शाखा आहे. या शाखेचे आनंद आश्रम असे नाव आहे. याच आनंद आश्रमात आनंद दिघे वास्तव्यास असून, ते जतनेशी याच शाखेत संवाद साधत होते. मात्र कालांतराने म्हणजेच आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे ठाण्यातील नेतेमंडळी ही शाखा सांभाळत होते. परंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या शाखेत कोण बसणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आनंद आश्रम या शाखेवर आपला दावा ठोकल्याच बोलले जात आहे. कारण शिंदे गटाकडून या शाखेवर बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावण्यात आला. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी न्यायहक्कासाठी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाचा नेमके प्रकरण काय?