घरक्राइमनाशिक बाजार समितीत ९० लाखांच्या अपहारप्रकरणी अखेर बडतर्फ कर्मचाऱ्यावर गुन्हा

नाशिक बाजार समितीत ९० लाखांच्या अपहारप्रकरणी अखेर बडतर्फ कर्मचाऱ्यावर गुन्हा

Subscribe

काही वर्षांपूर्वी बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा बाजार समितीत अपहार केल्याची घटना घडली होती. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाजार समितीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा जवळपास दोन वर्षानंतर दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेली माहिती आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप, (वय ५४ वर्षे, रा. प्लॉट नंबर २९५, गोकुळ नंद कॉलनी, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले आणि विश्वासघात केल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहे.

- Advertisement -

बडतर्फ कर्मचारी सुनील जाधव याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर जाधव याने न्यायालयासमोर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टासमोर पुरावे देतो असा अर्ज दिला होता. त्यावर कोर्टाने अर्ज मंजूर केला होता. दरम्यान बाजार समितीने जाधव याला दोनदा नोटीस देऊन अपहाराची रक्कम भरण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, त्याने नोटिसीला कुठलीही दाद न दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश घोलप, सचिव, नाकृउबा समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -