घरदेश-विदेशमहाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका वाढला; 'या' राज्यातील हवामान बदलणार

महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ राज्यातील हवामान बदलणार

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रसह देशात थंडी वाढत आहे. तर देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यात केरळ, अंदमान आणि निकोबार , माहे, पुडुचेरी, कराईकल आणि तामिळनाडू या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील वातावरणात बदल होत आहे.

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय द्वीपकल्यीपय भारतापर्यंत तीव्र ईशान्येकडील वारे खालच्या उष्णकटिबंधीय पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे देशातील बऱ्याच भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यात 20 ते 23 नोव्हेंबरमध्ये तामिनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशात 21 नोव्हेंबर रोजी पाऊस तर कर्नाटकात 22 आणि 23 नोव्हेंबरला पाऊस पडण्याची शक्यता. केरळ आणि माहेमध्ये 22 आणि 23 नोव्हेंबरला मुसळधार पाऊसाचा इशारा दिला असून येथील काही भागात दाट धुक्याची चादसर पाहायला मिळेलय 20 नोव्हेंबर सकाळी पूर्वी आणि दक्षिण आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा भागात दाट धुके पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभाने वर्तवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

देशातील ‘या’ राज्यात तापमान घटले

राज्यातील मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान कमालीचे घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. देशातील जम्मू-काश्मी, लडाख, गिलगिट, तेलंगणा, छत्तीसगड, रायलसीमा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, झारंखड, मेघालय, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, बाल्टिस्तान, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, कोकण, गोवा, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कम या राज्यातील हवामानात बदल झाला असून गारठा वाढला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP vs NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी

मच्छिमारांना इशारा

नैऋत्य बंगालच्या उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ वादळी वाऱ्याचा वेग 40-45 किमी ताशी 55 किमी प्रतिता होण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे तामिळनाडू आणि केरळमधील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊन मारेमारी करण्यास धोक्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -