घरमहाराष्ट्रदेशाच्या इतिहासात..., शेतकऱ्यांना जात विचारल्याप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया

देशाच्या इतिहासात…, शेतकऱ्यांना जात विचारल्याप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

नाशिक – रासयनिक खते खरेदी करण्याकरता ई-पॉस मशिनवर शेतकऱ्यांना जात विचारले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारने ई-पॉस मशिन सॉफ्टवेअर अपडेट केल्याने जातीचा पर्याय देण्यात आला आहे. यावरून राज्यभर खळबळ माजली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज सभागृहातही या विषयावर चर्चा झाली. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही याप्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे.

“शेतकऱ्यांना जात विचारणं हे चुकीचं आहे. आजपर्यंत देशाच्या किंवा राज्याच्या इतिहास असा प्रकार घडला नव्हता. जर शेतकऱ्यांना जात विचारली जात असेल तर याचे कारण काय? हे पुढे आलं पाहिजे. यासंदर्भात माहिती आम्ही घेतो आहे”, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागालँडबाबतही स्पष्टीकरण दिलंय. “नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला असं नाही. तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना ऐक्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.” असं शरद पवार यावेळी म्हणाले. यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, नागालॅंडमध्ये नागा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र एकत्र आणण्यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. नागालॅंडमधील मुख्यमंत्री हे भाजपचे नाहीत. तिथे कोणताच पक्ष हा सत्तेबाहेर नाही. नागालॅंडमध्ये ७ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकली आहे. त्यामुळे तिथल्या लोकप्रतिनिधींनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतू तिथल्या नागा समाजातील ऐक्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून जी पावले उचलली गेली आहेत, त्याला सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीने तिथल्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय.” असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

यावेळी शरद पवारांनी राज्यातील कांदा प्रश्नी आपली भूमिका मांडली. नाफेडमधून अद्यापही कांदा खेरदी सुरू झालेली नाही. शासकीय संस्थानी कांदा खरेदी केला पाहिजे. अवकाळीचा फटका इतर पिकांनाही बसलाय. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील केलंय. तसंच राज्यात सुरू असलेला कांदा प्रश्न राज्यसभेत मांडणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -