घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जनता दरबारात माजी उपसरपंचाने आमदाराला सुनावले; म्हणाले- 15 वर्षात कोणते आश्वासन पूर्ण...

जनता दरबारात माजी उपसरपंचाने आमदाराला सुनावले; म्हणाले- 15 वर्षात कोणते आश्वासन पूर्ण केले?

Subscribe

मागील काही महिन्यांपूर्वी शिक्षकांबाबत केलेले वक्तव्य आणि घेतलेल्या भूमिकांबाबत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब चांगलेच चर्चेत आले होते.

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत अगदी त्याच प्रमाणे आता लोकप्रतिनिधी पुन्हा निवडूण येण्यासाठी जनतेत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक प्रयत्न औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी केला. मात्र, यावेळी त्यांना आयोजित केलेल्या जनता दरबारातच माजी उपसरपंचाने चांगलेच खडेबोल सुनावले. यावेळी आमदारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या रंगलेल्या खडाजंगीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(In the Janata Durbar, the former Deputy Sarpanch told the MLA; Said- What promises have been fulfilled in 15 years?)

मागील काही महिन्यांपूर्वी शिक्षकांबाबत केलेले वक्तव्य आणि घेतलेल्या भूमिकांबाबत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून, यावेळी मात्र, कारण, त्यांच्या अंगलट आल्याचे आहे. झाले असे की, आता पुढील 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रतिनीधी आप-आपल्या मतदार संघात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. असाच एक प्रयत्न गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनीही केला. त्यांनी रांजणगाव येथे जनता दरबार आयोजित केला होहात. यावेळी मात्र त्यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना सळो की, पळो करून सोडले. यावेळी रांजणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद सदस्य उषा हिवराळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, अशोक धनावत, संजय खंबावत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : MAHARASHTRA NEWS : दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; करणार हे काम…

जोगेश्वरी येथील विकास कामांवरून झाला वाद

यावेळी जोगेश्वरी येथील विकास कामावरून माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दुबिले व आमदार प्रशांत बंब यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंचाच्या यांच्यामध्ये खडाजंगी झाली. माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक प्रतिप्रश्न केले. आमदारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप करत माजी उपसरपंच दुबिले यांनी आमदार प्रशांत बंब यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर आमदारांना उद्देशून तुम्ही केवळ सकारात्मक बोलता, पण नकारात्मक कामे करता, असाही टोला यावेळी माजी उपसरपंच दुबिले यांनी आमदार बंब यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा : Jayant Patil : “दुष्काळ आपल्या दारी” म्हणत जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

आमदारांचा काढताय पाय घेण्याच प्रयत्न पण…

माजी उपसरंपच दुबिले यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यानंतर आमदार प्रशांत बंब म्हणाले की, तू आधी खोटं बोलला की नाही, तू आधी माझं ऐकून घे…. तू असं करू नकोस… तुला जे बोलायचं ते नंतर बैठक घेऊन बोल. मी यांचं ऐकून घेतलं आहे. मी 15 तारखेच्या आत नागरिकांशी बोलतो, असा युक्तिवाद करून आमदार बंब उपसरपंचांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे म्हणत आमदारांना कोंडित पकडलं.

- Advertisment -