Maharashtra Corona Update : मागील २४ तासांत राज्यात ५३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत घट

राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update) रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ५३६ इतक्या नवीन कोरोनाबाधित (Corona Patients) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. राज्यातील मृत्यूदर (Deaths ) हा १.८७ टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत ७७,३४,४३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे (Recovery) होण्याचे प्रमाण हे ९८.०९ टक्के इतके झाले आहे.

राज्यात आज एकूण २ हजार ५६८ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १७९७ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर पुण्यामध्ये ३०८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. मागील २४ तासांमध्ये एकूण ३२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.५९ टक्के

राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा १.५९ टक्के आहे. तर मुंबई, पुण्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळत आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री त्यासोबतच राज्य शासनाकडून केलं जात आहे. काल राज्यामध्ये ५११ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर २४ तासांमध्ये एकूण ३२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. मात्र, एका रूग्णाचा मृत्यू झाला होता.

देशात गेल्या २४ तासांत २ हजार ७१० नवे रुग्ण

भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ हजार ७१० नवे रुग्ण आढळले असून १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत २ हजार २९६ कोरोनारुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ५११ नव्या रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू