Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मध्यरात्री लागले 'मोदी हटाव, देश बचाओ'चे बॅनर; कोल्हापुरात रंगली चर्चा

मध्यरात्री लागले ‘मोदी हटाव, देश बचाओ’चे बॅनर; कोल्हापुरात रंगली चर्चा

Subscribe

कोल्हापूर : ‘मोदी हटाव, देश बचाव’ (‘Modi Hatav, Desh Bachao’ banners) या आशयाचे बॅनर्स आज (30 मार्च) कोल्हापुरातील (Kolhapur) चौकाचौकात लागल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरातील जनता बाजार चौक, माऊली चौक, पार्वती टॉकीज यासारख्या महत्त्वाच्या चौकात बॅनर्स लागले आहे. आम आदमी पक्षाच्या पोस्टर्स अभियाननुसार हे बॅनर्स लावले असल्याचे समजते.

‘मोदी हटाव, देश बचाव’ पोस्टर्स आम आदमी पक्षाने (Aap Aadmi Party) काही दिवसांपूर्वीच दिल्लीत असे पोस्टर्स लावले होते.  पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर दाखल करताना 6 जणांना अटक केली होती. या अटक कारवाईनंतर 23 मार्च रोजी आम आदमी पक्षाने जंतर-मंतर येथे एक मोठी जाहीर सभा घेतली होती. या सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 30 मार्च रोजी देशभरात 11 भाषांमध्ये ‘मोदी हटाओ, देश बचाओ’चे पोस्टर जारी करेल असे म्हटले होते.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी पोस्टरवर केलेल्या कारवाईवरून केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. केजरीवाल म्हणाले होते की, पोस्टर लावणारे लोक लहान आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली कारवाई त्यांना शोभत नाही. यावेळी त्यांच्यासह ‘आप’च्या अनेक बड्या नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार या पोस्टर्सना घाबरले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.

‘आप’चे राज्य संयोजक गोपाल राय (Gopal Rai) यांनी मंगळवारी (२८ मार्च) सांगितले होते की, देशात भाजपची अघोषित हुकूमशाही सुरू असून ते लोकशाही नष्ट करण्यात मग्न आहेत. भाजपा निवडणूक आयोग आणि सीबीआय-ईडी यांना त्यांच्या आदेशांचे पालन करण्यास भाग पाडत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यापुरतेच भाजपाचे काम मर्यादित राहिले आहे. न्यायव्यवस्थेवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य सरकारांना स्वतंत्रपणे काम करू देत नाही आहे. पण आता देशातील विरोधी पक्ष नेते आता कोणत्याही प्रकारच्या षडयंत्र आणि बनावट एफआयआरला घाबरत नाहीत, असे गोपाल राय यांनी म्हटले होते.

- Advertisement -

आम आदमी पक्षाकडून ११ भाषांमध्ये पोस्टर्स (Posters from Aam Aadmi Party in 11 languages)
आम आदमी पार्टीने पंतप्रधानांच्या विरोधात 11 भाषांमध्ये पोस्टर जारी केले आहेत. पोस्टर्स हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी, मल्याळम, ओरिया, कन्नड, बंगाली, गुजराती, उर्दू आणि तेलुगू भाषांमध्ये तयार करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे पोस्टर्स अभियान सुरू केले आहे.

- Advertisment -