घरपालघरअपुरी वैद्यकीय सेवा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतली, पालघरमधील दुर्दैवी घटना

अपुरी वैद्यकीय सेवा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतली, पालघरमधील दुर्दैवी घटना

Subscribe

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये एका गर्भवती महिलेला अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साडे आठ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला आहे.

आजही राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांची कमतरता असल्याकारणाने रूग्णांना आपला जीव गमवावा लागतो. ग्रामीण भागात या घटना अनेकदा घडताना दिसतात. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये एका गर्भवती महिलेला अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साडे आठ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूतील ओसरविरा पाड्यात ही घटना घडली आहे. (Inadequate medical care kills pregnant woman, unfortunate incident in Palghar)

हेही वाचा – भाऊ म्हणून मी…; MPSCच्या विद्यार्थ्यांने पुण्यामध्ये केली आत्महत्या

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली राजू वाघात (वय वर्षे 21) नामक गर्भवती महिलेला 27 मे ही प्रसूतीची तारिख देण्यात आली होती. पण, शुक्रवारी (ता. 12 मे) सायंकाळी अचानक तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. ज्यानंतर तत्काळ तिला तिच्या कुटुंबियांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्या गर्भवतीला रुग्णालयातील नर्सकडून एक गोळी देण्यात आली. पण त्यानंतर बराच वेळ तिच्याकडे रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरने किंवा नर्सने लक्ष दिले नाही, अशी माहिती महिलेच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान बराच वेळ या महिलेवर कोणतेही उपचार करण्यात येत नसल्याने आणि रुग्णालयातील कोणाचेही तिच्याकडे लक्ष नसल्याने या महिलेला डहाणूतील धुंदलवाडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण धुंदलवाडी येथे जात असतानाच या महिलेचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला.

- Advertisement -

तर सोनाली या गर्भवती महिलेला कावीळ झाली होती. ही कावीळ शेवटच्या स्टेजला गेली होती. महिलेची प्रकृती अधिक खालावल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तीला रुग्णालयात दाखल केले, पण जर तिला आधीत रुग्णालयात आणले असते तर तिच्यावर योग्य ते उपचार करता आले असते, पालघरचे सिव्हिल सर्जन बोधाडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर कासा येथे कोणतीही वैद्यकीय सुविधा नव्हती. त्यांनी उपचार केले नाहीत. त्यामुळे महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -