घरठाणेशेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ; बळीराजाचे प्रश्न बांधावर जाऊन सोडवण्याचा निर्धार

शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ; बळीराजाचे प्रश्न बांधावर जाऊन सोडवण्याचा निर्धार

Subscribe

ठाणे : शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्यावतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ आज टेंभीनाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. (Inauguration of Farmer Dialogue Yatra by Chief Minister Balirajas problem is resolved by going to the dam

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील होते. बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकार सत्तेवर असताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. तोच विचार अंगिकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेचा माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाइन त्या शेतकऱ्याशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा नवीन मतदारयादी कार्यक्रम जाहीर

आजपासून ही सुरु यात्रेला सुरूवात झाली असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी प्रामुख्याने त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना थेट माहिती देणे, त्यांना त्या योजनांचे लाभ मिळवून देणे तसेच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठी महिलेला घर नाकारलेल्या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या…

या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणे शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आतापासूनच आ वासून उभे आहेत. अशात शासनाचे शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतकरी संवाद शुभारंभ प्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -