Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण, NCIचं महत्त्व काय?

नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण, NCIचं महत्त्व काय?

Subscribe

नागपुरात आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उद्योजक गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार होते. परंतु त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे दोन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आपला नागपूरचा दौरा रद्द केला. नागपुरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे पाहिलं जात आहे.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महत्त्व काय?

- Advertisement -

– 470 बेडचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट
– 10 अद्ययावत ऑपरेशन थिएटर
– कर्करोगाच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय
– ओन्कॉलॉजी आयसीयू असलेलं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय
– लहान मुलांवर सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार देणारं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय

2017 मध्ये एनसीआयची सुरुवात 30 बेडच्या छोट्याशा रुग्णालयाच्या स्वरुपात धरमपेठ परिसरात झाली होती. आता या रुग्णालयाला विराट स्वरुप प्राप्त झाले आहे. यावेळी 470 बेडचे कॅन्सरचे अत्याधुनिक रुग्णालय तयार झालं आहे.


हेही वाचा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अजित पवारांची मागणी


 

- Advertisment -