Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा राज्यातील जनतेला संदेश - सचिन...

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा राज्यातील जनतेला संदेश – सचिन सावंत

GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही.

Related Story

- Advertisement -

मुंबई विमानतळाचे मुख्यालय आता मुंबईतून अहमदाबाद येथे हलवण्यात आलं आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे पाहिले तर निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील जनतेला संदेश आहे असे वक्तव्य काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. मुंबई विमानतळावर दांडीया नृत्य झाले हे या अगोदर कधीच झालं नव्हते परंतू ते बरंच काही सांगून जातंय, गेल्या ५ वर्षांमध्ये जाणीवपुर्वक मुंबईचे आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या घटनांकडे पाहिले गेले पाहिजे असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

जागतिक वित्तिय केंद्र किंवा मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मुंबईतून बाहेर गुजरातमध्ये नेण्याचा जो प्रयत्न झाला आहे. तो याच मानसिकतेतून झाला असल्याचे निश्चित आहे. महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. जे उद्योजक महाराष्ट्रात आले अनेक उद्योग महाराष्ट्रात आल्यानंतर ते महाराष्ट्राचे झाले आहेत. त्याच पद्धतीचा आदरही महाराष्ट्राच्या जनतेनं त्या उद्योजकांना दिला आहे. यापुर्वी मुंबई विमानतळाचा कारभार GVK समुहाकडे होता. हा समूह आंध्रप्रदेशचा आहे. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही. निश्चितपणे ही घटना दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनतेचे डोळे या घटनेमुळे उघडतील अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी ग्रुपकडे गेला आहे. विमानतळाच्या विकासकामांचा ताबा मिळताच अदानी यांनी विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. जीव्हीके समुह आर्थिक संकटात आल्यामुळे विमानतळाचा ताबा अदानी ग्रुपकडे देण्यात आला आहे. अदानी ग्रुपकडे मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळाचा ताबा आला आहे. अदानी समूह एएएचएलने खरेदी करण्यापुर्वी मुंबई विमातळाचे मुख्यालय मुंबईत स्थापन केलं होते. विमानतळाची खरेदी प्रक्रिया करुन ताबा मिळवल्यानंतर मुख्यालय आता अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुंबई विमानतळावर गरबा करण्यात आला होता. यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

- Advertisement -