घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पात नांदगांव, सटाण्याचा समावेश करा : डॅा. भारती पवार

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पात नांदगांव, सटाण्याचा समावेश करा : डॅा. भारती पवार

Subscribe

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नार -पार गिरणा नदीजोड योजना ही सुरगाणा आणि नाशिकसाठी प्रस्तावित असून यात नार पार औरंगा व आंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमीकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात.हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोर्‍यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेत नांदगाव आणि सटाणा या तालुक्यांचाही डीपीआरमध्ये सामावेश करावा अशी मागणी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्व खासदारांची बैठक झाली. या बैठकीत बोलतांना डॉ. पवार म्हणाल्या, एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार, पार, औरंगा व आंबिका या पश्चिमी वाहिनी नदी खोर्‍यातील ३०४.६ दलघमी पाणी नार- पार- गिरणा नदीजोड योजनेमुळे वळविण्याचे नमूद आहे. यासाठी साधारणतः आठ हजार कोटीचा निधी राज्य शासन खर्च करणार असून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. नाशिक जिल्हयात या योजनेद्वारे सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी तसेच वहन व्ययसाठी एकुण १४९.८३ दलघमी पाणी वळविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव व सटाणा हे दोन्ही तालुके टंचाईग्रस्त तालुके असुन येथे नियमित पिण्याच्या व सिंचनाच्या समस्या भेडसावत असल्याने या दोन्ही तालुक्यांचा डिपीआर मध्ये समावेश झाल्यास येथील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -