घरमहाराष्ट्रपुणेआयकर विभागाची नजर आता शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर

आयकर विभागाची नजर आता शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर

Subscribe

पुण्यामध्ये आज ईडीकडून एकूण आठ जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांचा देखील समावेश आहे. सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय तसेच घरावर छापेमारी करण्यात आली.

पुण्यामध्ये आज आयकर विभागाकडून एकूण आठ जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांचा देखील समावेश आहे. सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय तसेच घरावर छापेमारी करण्यात आली.

पुण्यातील मोठे उद्योजक म्हणून नावाजलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरज पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखले जातात. बुधवारी (ता. १५ फेब्रवारी) सकाळी आयकर विभाकडून ही कारवाई करण्यात आली. याशिवाय आयकर विभागाने आणखी सहा ते सात जागांवर छापेमारी केली.

- Advertisement -

हेही वाचा – समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मुंबई बुडणार का?; संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी दिली माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या संशयातून आयकर विभागाकडून ही तपासणी करण्यात आली. यावेळी देशपांडे यांच्या घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांची देखील तपासणी करण्यात आली. भल्या पहाटेपासूनच आयकर विभागाकडून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, ही कारवाई सुरु होताच पुण्यातील उद्योग जगतात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. शरद पवार यांच्यासह अनिरुद्ध देशपांडे यांचे इतर मोठ्या राजकीय नेत्यांसोबत देखील जवळचे संबंध असल्याने याबाबत आणखी चर्चा होऊ लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -