घरमहाराष्ट्रपुणेशरद पवारांचा निकटवर्तीय Income Tax च्या रडारवर; सहा ठिकाणी केली छापेमारी

शरद पवारांचा निकटवर्तीय Income Tax च्या रडारवर; सहा ठिकाणी केली छापेमारी

Subscribe

बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडसत्राची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अशात आयकर विभागाने आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीयांच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. पुण्यातील सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तेवर आयकराने ही छापेमारी केली आहे. बीबीसीवरील छापेमारीनंतर आयकर विभागाने पुण्यात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. अनिरुद्ध देशपांडे यांच्या सिटी ग्रुपच्या ऑफिससह त्यांच्याशी संबंधित मालमत्तेवर ही छापेमारी केली आहे.

देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर ही छापेमारी केली आहे. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळील अॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसह मालमत्तेची छाननी केली आहे. आज सकाळपासूनचं आयकर विभागाचे अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांच्या मालमत्तेवर छापेमारी करत आहेत.

- Advertisement -

पुण्यातील बांधकाम क्षेत्रात सिटी ग्रुप हा एक आघाडीचा समूह मानला जातो. अनिरुद्ध देशपांडे या सिटी ग्रुपचे संस्थापक आमि समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सिटी ग्रुपने पुण्यातील अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प साकरले आहेत. त्यामुळे आयकर विभागाच्या छापेमारीमुळे पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

अद्यापही बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. यात दोन्ही शहरांतील कार्यालयाची, अधिकाऱ्यांची आयकर विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. काल दुपारपासून सुरु झालेली ही चौकशी अद्याप सुरू आहे. आयकर विभागाकडून बीबीसीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे देशातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.


काँग्रेस हा एकसंघ, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरला; पटोलेंची भाजपवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -