घरताज्या घडामोडीIncome Tax department : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेनामी संपत्ती आयकर विभागाकडून जप्त,...

Income Tax department : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेनामी संपत्ती आयकर विभागाकडून जप्त, सोमय्यांचा दावा

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी, साखर कारखान्यांवर, मुलगा पार्थ पवारच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. तर आता थेट अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. तर अजित पवारांचा मुलगा, बहिण, जावाई यांच्या संपत्तींवर जप्तीचे आदेश दिले असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधत हजारो कोटीची बेनामी संपत्ती गोळा केली असल्याचा आरोप केला. सोमय्यांच्या आरोपानंतर आज अजित पवारांविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी लोकांवर सलग ७ ते ८ दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये पवारांच्या बहिण आणि मुलाचाही समावेश आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असल्याचे आढळले आहे. या संपत्तीच्या प्रकरणातच अजित पवारांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समजते आहे. तसेच १ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पवारांचे जावई मोहन पाटील यांच्या नावे बेनामी संपत्ती उभी केली असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांनी आपली बहिण आणि मेव्हण्याच्या नावावर बेनामी संपत्ती गोळा केली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीवर कारवाई करण्यात येत आहे. अजित पवारांना आयकर विभागाने ९० दिवसांचा वेळ दिला असून या वेळात ही संपत्ती बेनामी नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. पुण्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्याल, गोव्यातील रिसॉर्ट आणि राज्यातील वेगवेगळ्या २७ जिल्ह्यातील जमीनींचा यामध्ये समावेश आहे.


हेही वाचा :  तिन्ही राज्यातील भाजप सरकारची परमबीर सिंहांना पळून जाण्यासाठी मदत- नवाब मलिक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -