घरताज्या घडामोडीIncome Tax Raid: युनिकॉर्न ग्रुपच्या पुणे आणि ठाण्यातील ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी,...

Income Tax Raid: युनिकॉर्न ग्रुपच्या पुणे आणि ठाण्यातील ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी, १ कोटींसह २२ लाखांचे दागिने जप्त

Subscribe

आयकर विभागाने पुणे आणि ठाणे येथील ठिकाणांवर युनिकॉर्न स्टार्ट-अप ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकून बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. ९ मार्च रोजी युनिकॉर्नच्या देशभरातील २३ कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. यामध्ये आतापर्यंत १ कोटींहून अधिक रोकड आणि २२ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच युनिकॉर्न ग्रृपने फसवी खरेदी करून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम खर्च करून जमिनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

ही कंपनी, बांधकाम साहित्याचा घाऊक आणि किरकोळ पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा देशभर वावर असून त्यांची वार्षिक उलाढाल ६००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या शोधमोहिमेदरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात एकूण २३ ठिकाणी करवाई करण्यात आली.

- Advertisement -

या शोधमोहिमेदरम्यान, अनेक महत्वाचे पुरावे -ज्यात कागदपत्रे आणि डिजिटल डेटाचा समावेश आहे, अशी मिळाली असून, हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरुन, या कंपनीने, अनेक बनावट खरेदी, बेहिशेबी रोखीचे व्यवहार केले असल्याचे आढळले आहे, त्याशिवाय, साधारण ४०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोंदी देखील आढळल्या आहेत. या सगळ्या पुराव्याबाबत, कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता, त्यांनी अशाप्रकारे व्यवहार केल्याची कबुली दिली. तसेच, विविध मूल्यांकन वर्षात,२२४ कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न मिळवल्याचेही सांगितले. तसेच या उत्पन्नावरील सर्व देय कर भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

- Advertisement -

ही छापेमारी आणि शोधमोहिमेत असेही आढळले की, या कंपनीला मॉरिशस मार्गे मोठा परदेशी निधी देखील मिळाला आहे. मोठ्या प्रीमियमच्या समभागांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे, असेही लक्षात आले.

तसेच, शोध मोहिमेदरम्यान, मुंबई आणि ठाण्यातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काही हवाला व्यवहार होत असल्याचेही आढळले. या कंपन्या केवळ कागदावर अस्तित्वात असून, बनावट नोंदी दाखवण्यासाठीच त्या तयार करण्यात आल्या होत्या. प्राथमिक माहितीत असेही आढळले आहे, की ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले त्यांचे मूल्य १५०० कोटींपेक्षा अधिक आहे. या कारवाई दरम्यान आतापर्यंत, १ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि २२ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढचा तपास सुरु आहे.


हेही वाचा : IPL 2022: आयपीएल २०२२ मध्ये मोहित शर्माची एन्ट्री, २०१४ मधील पर्पल कॅप विजेता आता गुजरात टायटन्सकडून खेळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -