सातारा : विधानपरिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळखर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने ( इन्कम टॅक्स ) छापा टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. त्यापूर्वीच आयकर विभागने झापा टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आयकर विभागाचे पथक सकाळी सहा वाजता संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून आयकर विभागाच्या पथकाकडून संजीवराजे यांची चौकशी सुरू आहे. संजीवराजे यांच्या घरात कुणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती आहे.
हेही वाचा : घोटाळा-टोणा’ करुन 76 लाख मतदान वाढवले; शिवसेना ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला
संजीवराजे यांच्यासह रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्याव घरावर देखील आयकर विभागाने धाड टाकली आहे. हे दोघेही रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. धाडी पडण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रघुनाथराजे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर, संजीवराजे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांचा पराभव झाला. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांचा विजयी झाल्यानंतर संजीवराजे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ होते. त्यामुळे लवकरच संजीवराजे अजितदादांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच संजीवराजेंच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला गैरहजर छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; म्हणाले…