घरताज्या घडामोडीकितीही त्रास दिला तरी महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, आयकरच्या छापेमारीवर सुप्रिया सुळेंचा...

कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, आयकरच्या छापेमारीवर सुप्रिया सुळेंचा घणाघात

Subscribe

सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही आणि करणार ही नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित असलेल्या कारखाना संचालकांच्या घरी आणि नातेवाईक, बहिणी तसेच पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन आयकर विभागाची टीम छापेमारी करत आहे. गुरुवारपासून सुरु असलेली कारवाई शुक्रवारी लगातार सुरुच ठेवण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्र हा दिल्लीसमोर झुकणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच संघर्ष पवारांची खासियत असल्याचेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आह.

राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी केंद्रावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत ते केवळ अजितदादांचे नातेवाईक नसून आमचेही नातेवाईक आहेत. आमचे सर्वांचे एकत्र कुटुंब आहे असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले. तर दिल्लीकडून अशा प्रकारे सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलय.

- Advertisement -

संघर्ष करण ही पवारांची खासियत

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं आहे की, आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही आणि करणार ही नाही असेही त्या म्हणाल्या. संघर्ष करणं हीच पवारांची खासियत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या संबंधीत असलेल्यांवर छापेमारी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधीत असलेल्या लोकांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या सीईट्री कार्यालयामध्ये आयकरच्या अधिकाऱ्यांनी तब्बल २८ तास तपास केला. तसेच अजित पवारांच्या तीन बहिणींच्या घरी आणि मुक्ता पब्लिकेशनवर पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अजित पवार यांच्या संबंधीत असलेल्या कारखाना संचालकांच्या घरी देखील आयकर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. एकाच वेळी या सर्व ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकार यंत्रणांद्वारे चौकशी करुन राजकारण आणि नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात IT च्या दुसऱ्या दिवशीही धाडी सुरु, १ हजार ५० कोटींचे आढळले संशयास्पद व्यवहार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -