Pune Corona: आज १,५५६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ; १,५७० जणांना डिस्चार्ज

Coronavirus

आज दिवसभरात पुणे शहरात १ हजार ५५६ कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळले आहेत. तर शहरातील उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ७५७ इतकी झाली आहे. यापैकी ७९३ जण हे कोरोनाचे गंभीर रूग्ण असून सध्या ४८३ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५७० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ५५६ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. तसेच आज १ हजार ५७० रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण ६३ हजार ९१९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

पुण्यात आज ७ हजार २०८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून पुणे शहरात आतापर्यंत एकूण ३ लाख ९१ हजार ०३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण ८० हजार ५९३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत,
तर १४ हजार ७५७ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७५७ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ६३ हजार ९१९ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ९१७ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर ७ हजार २०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ९१ हजार ३६ वर गेला आहे़, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


‘या’ वयातील रूग्णांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये हलवणार; मुंबई महापालिकेचा निर्णय