राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले अनेक सेलेब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोनाच्या बीए ४ आणि बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला. राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत.

Rajesh Tope said will not relax the mask use but cm thackeray soon announce relax restrictions before Gudi Padwa

राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही, पण या ६ जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मास्कचा वापर अद्याप सक्तीचा केलेला नाही. दंडही आकारण्यात येणार नाही, पण सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन करीत असल्याचे टोपे यांनी पुन्हा एकदा सांगितले.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोविड सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी सांगितले की, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ६ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या जिल्ह्यांत ३ ते ८ टक्के पॉझिटिव्हीटी दर आहे. चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असले तरी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही, पण या ६ जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

यंदाची वारी निर्बंधमुक्त
आता तर जुलै महिन्यात आषाढी एकादशी आहे. वारीमध्ये १० ते १५ लाख वारकरी सहभागी होतात. वारीची तयारी पुढे गेली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट असले तरी काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी, असा तत्वतः निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे यंदाची वारी होईल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

करण जोहरच्या पार्टीत सेलिब्रिटी पॉझिटिव्ह
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले अनेक सेलेब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोनाच्या बीए ४ आणि बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला. राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे टोपे म्हणाले.

बूस्टर डोसचे आवाहन
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावा. दुसरा डोस घेतल्यावर ९ महिने झाले असतील तर त्यांनी बूस्टर डोस घ्यावा. स्वतःची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.