घरताज्या घडामोडीअतिवृष्टीच्या मदतीत वाढ; शेतकऱ्यांना सुधारीत दराने मिळणार मदत

अतिवृष्टीच्या मदतीत वाढ; शेतकऱ्यांना सुधारीत दराने मिळणार मदत

Subscribe

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे (एसडीआरएफ) सुधारित दर राज्य सरकारने स्वीकारले असून अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गीक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीवर नव्या दराप्रमाणे वाढीने मदत मिळणार आहे

मुंबई : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे (एसडीआरएफ) सुधारित दर राज्य सरकारने स्वीकारले असून अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गीक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीवर नव्या दराप्रमाणे वाढीने मदत मिळणार आहे. महसूल आणि वन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून सर्व प्रकारच्या मदतीचे सुधारीत दर जाहीर केले आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत सुधारणा करावी, अशी आग्रही मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार केंद्राने ऑक्टोबर महिन्यात सुधारीत निकषांना मान्यता दिली. मदतीचे हे सुधारीत दर २०२२ ते २०२५ पर्यंत लागू राहणार आहेत. मार्च महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीला आता सुधारीत दराने मदत मिळेल.

- Advertisement -

२०१५ ते २०२० च्या एसडीआरएफच्या प्रचलित दरानुसार जिराईत पिकांना प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळत होती, ती आता ८ हजार ५०० रुपये मिळेल. बागायती पिकांना प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये मिळत होते. आता सुधारीत दराने १७ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळेल. बहुवार्षिक पिकांना १८ हजार प्रतिहेक्टरी मदत मिळत होती, ती आता २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी अशी मदत मिळणार आहे.

आता अशी मिळणार मदत

- Advertisement -
  • मृत व्यक्ती ४ लाख रुपये
  • अवयव निकामी झाल्यास ७४ हजार ते अडीच लाख रुपये
  • जखमी व्यक्ती १६ हजार रुपये
  • घर पाण्यात बुडाल्यास २५०० रुपये प्रति कुटुंब
  • शेतजमीनीवर गाळ जमा झाल्यास १८ हजार रुपये प्रति हेक्टर
  • जमीन खरडल्यास ४७ हजार प्रतिहेक्टर
  • कोरडवाहू पीक ८ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर (२ हेक्टर मर्यादा)
  • बागायती पीक १७ हजार प्रति हेक्टर (२ हेक्टर मर्यादा)
  • बहुवार्षिक पिक २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टर मर्यादा)
  • दुधाळ म्हैस ७ हजार ५०० रुपये प्रति जनावर
  • मेंढी ४ हजार रुपये
  • बैल ३२ हजार रुपये प्रति
  • वासरु २० हजार रुपये प्रति
  • कोंबडी १०० रुपये प्रति
  • मासेमारी बोट १५ हजार प्रति
  • पक्के घर पडल्यास १ लाख २० हजार प्रति कुटुंब
  • कच्चे घर पडल्यास १ लाख ३० हजार प्रति कुटुंब
  • घराची पडझड ६ हजार ५०० प्रति
  • झोपडी ८ हजार, गोठा ३ हजार रुपये

हेही वाचा – मुंबईत जलवाहिनी फुटली, दोन दिवस १५ टक्के पाणीकपात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -