नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, मृत्यूदर घटला पण पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्क्यांवर

राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख चढा राहिल्याने धोका वाढला आहे. येत्या काळात राज्यात खरच कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असंही सांगण्यात येतंय.

राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होत असून आज दिवसभरात राज्यात २७०१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकट्या मुंबईत १७६५ बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख चढा राहिल्याने धोका वाढला आहे. येत्या काळात राज्यात खरच कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असंही सांगण्यात येतंय. (Increase in number of new corona patients, decrease in mortality but positivity rate more than at 9%)

हेही वाचा – कोरोना नियमांचे पालन करून शाळा भरणार, पालिकेचं विद्यार्थ्यांच्या संरक्षणाला प्राधान्य

राज्यात आज २७०१ नवे रुग्ण सापडले असून १३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर, सध्या राज्यात ९ हजार ८०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात मृत्यू दर १.८७ (Death Rate) टक्के आहे तर, पॉझिटिव्हीटी रेट (Positivity Rate) ९.७३ टक्क्यांवर पोचला आहे. रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

कोणत्या जिल्ह्यांत किती रुग्ण सक्रिय

मुंबई – ७०००
ठाणे – १४८२
पालघर – १८१
रायगड – २५३
रत्नागिरी – १७
सिंधुदुर्ग – १०
पुणे – ६५०
सातारा -६
सांगली – ७
कोल्हापूर – १

कोरोना प्रतिबंध नियम पाळण्याची गरज

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोना प्रतिबंध नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले गेले. दरम्यान, कोरोनाचा विळखा सैल झाल्याने अनेक देशांमध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आला. राज्यातही मास्कसक्ती हटवण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंध नियम पाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

मुंबईतील धोका वाढला

राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत वाढल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे रुग्णवाढीला लगाम लावण्याकरता मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कल्याण-डोंबिवली गेल्या २४ तासांत ३० नवे रुग्ण सापडले असून सध्या ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.