घरताज्या घडामोडीमुंबईत ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ; ४ बी.ए.व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद

मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ; ४ बी.ए.व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य खात्याने जिनोम सिक्वेन्सिंगच्या १२ व्या फेरीत २७९ नमुन्यांची चाचणी करून त्यांचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यामध्ये, मुंबईतील २०२ व मुंबई बाहेरील ७७ नमुन्यांचा समावेश आहे. या मुंबईतील २०२ पैकी ९९.५ टक्के अर्थात २०१ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटने बाधित असल्याचे तर १ नमुना हा ‘डेल्टा’ (Delta) या व्हेरियंटने बाधित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, या मुंबईतील २०२ नमुन्यांमध्ये, बी.ए. ४ चे ३ आणि बी.ए.५ व्हेरीयटंचा १ असे ४ रुग्ण आढळून आले आहेत. तर एक नमुना हा ‘डेल्टा’ या व्हेरियंटने बाधित आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यावर उपाय करणे त्वरित शक्य व्हावे यासाठी मुंबई महापालिकेद्वारे ऑगस्ट २०२१ पासून ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ चाचण्या नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशाने नुसार आतापर्यंत १२ फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच जाहिर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबईत चाचणी करण्यात आलेल्या २०२ रुग्णांपैकी ४४ टक्के अर्थात ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील, २६ टक्के म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण ४१ ते ६० या वयोगटातील, १६ टक्के म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. तर १२ टक्के म्हणजेच २४ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील असून २ टक्के म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.

२४ लहान मुलांनाही बाधा

सदर २०२ नमुन्यांमध्ये, ० ते १८ या वयोगटातील २४ नमुन्यांचा समावेश आहे. त्यापैकी १ नमुना हा ० ते ५ वर्षे या वयोगटातील, १० नमुने ६ ते १२ वर्षे वयोगटातील तर १३ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील आहेत. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.

- Advertisement -

२०२ पैकी २ रुग्णांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १२९ रुग्णांपैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. ७१ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचा एकही डोस घेतला नव्हता. तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.


हेही वाचा : अखेर हरकती, सुचनांवर सुनावणी न घेता प्रभाग आरक्षणावर शिक्कामोर्तब; काँग्रेस न्यायालयात दाद मागणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -