घरताज्या घडामोडीमिंधे सरकार आल्यापासून दंगलींच्या प्रमाणात वाढ, ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल

मिंधे सरकार आल्यापासून दंगलींच्या प्रमाणात वाढ, ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

राज्यातील काही भागांत दंगलसदृश्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जातीय आणि धार्मिक दंगलींच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यावेळी अकोला, नगर आणि त्र्यंबकेश्वरमधील घटनांचा हवाला देत सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात मिंधे सरकार आल्यापासून दंगलींचे प्रमाण वाढले आहे, असं म्हणत ठाकरे गटाने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मिंधे सरकार आल्यापासून दंगलींच्या प्रमाणात वाढ

- Advertisement -

महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. अकोला येथे सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे. तथापि संपूर्ण शहरात या हिंसाचारामुळे भीतीचे सावट आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवरून अकोल्यात एक दंगल उसळली व अकोला शहर दोन दिवस धुमसत राहिले. हे धुमसणे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीला मानवणारे नाही, पण महाराष्ट्र धुमसत राहावा याचे योजनाबद्ध नियोजन पडद्यामागून सुरू आहे. अकोल्यापाठोपाठ नगर जिल्हय़ातील शेवगाव येथेही हिंसाचार झाला. रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली व प्रकरण नियंत्रणाबाहेर गेले. शेवगावच्या दंगलीत पोलीस जखमी झाले, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा कारखाना

काही मुस्लिम मंडळींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून चादर चढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षातील ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळा’ने यावर लगेच आपापले भोंगे वाजवून राजकीय ‘जनजागृती’चे कार्य हाती घेतले. प्रश्न धार्मिक भावनांचा आहे. अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधानांपासून बरेच भाजप नेते श्रद्धेची चादर चढवीत असतात, पण ती त्यांची प्रतीके आहेत. हिंदू देवतांवर चादर चढविण्याच्या पद्धती नाहीत. गणेशोत्सवात अनेक मुसलमान बांधव श्रद्धेने येत असतात. मुस्लिम मोहल्ल्यांतून विसर्जनासाठी जाणाऱ्या लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा वगैरे मिरवणुकांवर पुष्पवृष्टी, पूजाअर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा जंगी सोहळा पार पडला. भर उन्हात लाखो श्री सेवक जमले. त्यांना पाण्याच्या बाटल्या, सरबत, खायचे पदार्थ देण्याचे काम मुस्लिम संघटनांचे युवक करीत होते. महाराष्ट्रात हा असा सलोखा चांगल्या पद्धतीने निर्माण झाला असताना कोणाला तरी या सद्भावनेला चूड लावायची इच्छा दिसत आहे. कधी नव्हे ते यावेळी रामनवमीस मुंबईसह काही भागांत दंगली झाल्या. छत्रपती संभाजीनगरात हिंसाचाराचा भडका उडाला. हे कसले लक्षण मानायचे? राज्यात सध्या भडकविल्या जात असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फोल ठरत आहे. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा व दंगली घडविणारा कारखाना आहे, मात्र हा कारखाना आता दिवाळखोरीत निघाला आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा : जीवा भावाचा माणूस! गिरीश महाजन वाढदिवस शुभेच्छा बॅनरवर अजित दादांचा फोटो; राजकीय चर्चेला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -