घरमहाराष्ट्रस्कूल बस दरात वाढ, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांची माहिती

स्कूल बस दरात वाढ, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांची माहिती

Subscribe

महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना दरवाढीचा झटका बसणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बस चालकांनी स्कूल बसच्या शुल्कात वाढ कण्याचा निर्णय घेतला असून 20 टक्कयांनी दरवाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.

यामुळे 20 टक्के वाढ –

- Advertisement -

अनिल गर्ग म्हणाले इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. याचा फटका स्कूल बस चालकांना बसला आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्ष बस वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्च मोठा होता. यामुळे एप्रिल महिन्यातच आम्ही स्कूल बसच्या शुल्कात 30 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेणार होतो. मात्र, पालकांची अडचण होऊ नये यासाठी ही दरवाढ 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न –

- Advertisement -

स्कूल बस ओनर्स असोसिएशनशी संबंधित स्कूल बस चालकांकडून 1800 रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाते. साधारणपणे मोठ्या बसमध्य़े 40 विद्यार्थ्यांची आसन क्षमता असते स्कूल बससाठी राज्य शासनाचे कठोर नियम आहेत. त्यांची अंमलबजावणी करावी लागते. मात्र, काही वर्षांपासून अनिधिकृतपणे स्कूल व्ह्रॅन, रिक्षा, बसचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यांच्याकडून 1500 ते 2000 रुपये शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा मुद्दा गर्ग यांनी उपस्थित केला.

शिक्षण आयुक्तांकडून निर्देश –

राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 – 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचे या निर्देशात म्हटले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -