घरमहाराष्ट्रमिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ, आव्हाड वगळता अनेक माविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ, आव्हाड वगळता अनेक माविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Subscribe

रम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उमेदवार म्हणून होते. त्यावेळी आशिष शेलार, शरद पवार यांनी सुद्धा नार्वेकरांना मदत केली होती. परंतु ठाकरे कुटुंबातील तीन मते नार्वेकरांना मिळू शकली नाहीत

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत शिंदे – फडणवीस सरकार कडून कपात करण्यात आली आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणेज उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेले मिलींद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यामुले राजच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीमधील जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्या सुरक्षेत शिंदे -फडणवीस सरकारने कपात केली आहे. ज्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे त्यामध्ये वरून सरदेसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबिय, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील यांचा समावेश आहे.

- Advertisement -
eknath shinde devendra fadanvis
eknath shinde devendra fadanvis

तर मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा मिलींद नार्वेकरांना देण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे. यावरून आश्चर्य सुद्धा व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर ठाकरे, पवार कुटुंबियांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उमेदवार म्हणून होते. त्यावेळी आशिष शेलार, शरद पवार यांनी सुद्धा नार्वेकरांना मदत केली होती. परंतु ठाकरे कुटुंबातील तीन मते नार्वेकरांना मिळू शकली नाहीत त्यामुळेच मिलींद नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा सुरु होत्या. आणि म्हणूनच मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत शिंदे – फडणवीस सरकरने मिलींद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा –   … आणि ग्रहणानंतर सूर्य हसला, नासाच्या ‘त्या’ फोटोची चर्चा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -