घरताज्या घडामोडीमुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, ४ रुग्ण गंभीर, डॉक्टरांचा इशारा

मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, ४ रुग्ण गंभीर, डॉक्टरांचा इशारा

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सतंतधर होणाऱ्या मुसळधार पावसानंतर रूग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून ४ रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. तसेच हे रूग्ण व्हेंटिलेटरवर असल्यामुळे डॉक्टरांकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, शहरात इन्फ्लूएंझा H1N1ची लागण झालेले चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात पुन्हा व्हायरल संसर्ग पसरत आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. ज्या लोकांची कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह येत आहे त्यांनी H1N1 चाचणी करावी, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

- Advertisement -

इन्फ्लूएंझा H1N1चे जुलै महिन्यात ११ रूग्ण सापडल्याचं सांगितलं जात आहे. दररोज किमान दोन ते तीन केसेस समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. COVID-19 प्रमाणे, H1N1 हा एक श्वसन रोग आहे जो २०१९ मध्ये जागतिक महामारी म्हणून ओळखला जाऊ लागला.

H1N1मुळे राज्यात यंदाच्या वर्षात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. १० जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. शहरात, गेल्या तीन वर्षांत H1N1 ची २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये ६४ रूग्ण सापडल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, Oseltamivir सारखी स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. डॉ. वसंत नागवेकर हे एक संसर्गजन्य रोग विशेषज्ञ आहेत. ज्यांनी गेल्या काही आठवड्यात डझनभर प्रकरणांवर उपचार केले आहेत.


हेही वाचा : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -