24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ, राज्यात सध्या 20,820 सक्रिय रुग्ण

राज्यात ऐकूण 20,820 सक्रिय रूग्ण आहेत, यांपैकी सर्वाधिक रूग्ण मुंबईमध्ये आहेत त्यांची संख्या 6,409 इतकी आहे

सध्या भारतात कोरोना पुन्हा आपली मान वर करू लागला आहे. दिवसेंदिवस पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, भारतात कोरोना रूग्णांची पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. काल दिवसभरात ऐकूण 3098 नवे रुग्ण आढळले असून 4207 रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार , राज्यात काल संपूर्ण दिवसभरात कोरोनाचे पेक्षा जास्त रूग्ण आढळले. तसेच त्यांपैकी 6 रूग्ण दगावलेले आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आत्ता राज्यात ऐकूण 20,820 सक्रिय रूग्ण आहेत, यांपैकी सर्वाधिक रूग्ण मुंबईमध्ये आहेत त्यांची संख्या 6,409 इतकी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पुण्याचा सहभाग असून पुण्यात सध्या 5,335 रूग्ण सक्रिय आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ठाण्याचा सहभाग असून ठाण्यात सध्या 4,037 रूग्ण सक्रिय आहेत.

दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात 8,21,78,511 चाचण्यांनपैकी 79,89,909 चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळं सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटीचा दर 9.72 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर हा 1.85 टक्के आहे.

राज्यात बीए व्हेरिएंटचे रूग्ण आढळले
सध्या राज्यात बीए व्हेरिएंटचे 4 व्हेरिएंटचे 3 रूग्ण आढळले तर व्हेरिएंटचे 5 व्हेरिएंटचे 2 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये तीन पुरूष आणि २ स्रियांचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण मुंबई येथील आहेत.