सप्तशृंग गडावरील रुग्णसंख्येत चारने वाढ, अभोण्यातही एक बाधित

कळवण तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या झाली ९

corona test
कळवण : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी (दि.४) वाढ झाली असून सप्तशृंग गड येथील चार तर अभोण्यातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
चार दिवसांपूर्वी सप्तशृंग गडावरील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सप्तशृंग गडावर हा पहिलाच रुग्ण आढळला होता. अभोण्यातही मागील आठवड्यात एका शासकीय कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी आलेल्या अहवालानुसार सप्तशृंग गडावरील ८ वर्षाचा मुलगा, ३७ वर्षाची महिला, १६ वर्षाचा मुलगा, २८ वर्षीय महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर अभोण्यातील एका १९ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली. दरम्यान, कळवण तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ९ झाली आहे.