घरताज्या घडामोडीअवयवदानासाठी महाराष्ट्र सकारात्मक; ६० टक्क्यांनी अवयवदानात वाढ

अवयवदानासाठी महाराष्ट्र सकारात्मक; ६० टक्क्यांनी अवयवदानात वाढ

Subscribe

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवयवदानात तिपटीने वाढ झाली आहे.

कोणताही पुरोगामी विचार महाराष्ट्र सर्वात आधी अंगिकारतो. २०१९ या वर्षातील अवयवदानाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात अवयवदानात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही केलेल्या अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत अवयवदानात तिपटीने वाढ झाली आहे. २०१९ वर्षात राज्यात एकूण ५५९ अवयवदान झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात अवयवदानाच्या संख्येत वाढ होण्यासाठी गेल्या काही वर्षात सर्वत पातळीवर सतत प्रयत्न करण्यात आले.

अवयवांची गरज आणि पुरवठा यांच्यात मोठी तफावत

गर्दीच्या ठिकाणी जसे रेल्वे स्थानके, जत्रा, उत्सव, प्रदर्शनांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते स्टॉल लावतात. पत्रके-बॅनर्स-व्याख्याने घेत अवयवदानाबाबत गेल्या काही वर्षांपासून जनजागृती करत आहेत. सरकारी पातळीवरील संस्थांचाही यात सहभाग असून अनेक मासिकांत, सोशल मीडिया सारख्या तरुण वर्ग हाताळणाऱ्या माध्यमांतूनही अवयवदानाचा प्रचार करण्यात आला. तरीही अवयवांची गरज आणि पुरवठा यांच्यात मोठी तफावत असल्याने राज्यातील अवयवदान वाढले पाहिजे असे या चळवळीतील प्रमुख सांगतात.

- Advertisement -

अवयवदानाच्या प्रचारासाठी राज्यात एकूण ३ हजार किमीची पदयात्रा

संपूर्ण अवयवदानाचे वाढलेले प्रमाण पाहता मुंबई व्यतिरिक्त ग्रामीण भागातून अवयवदान होण्यास सुरू झाले आहे. म्हणजेच, ग्रामीण भागात प्रसार आणि जागरुकता वाढत आहे. ही जागरुकता सामाजिक संस्थांमुळे वाढत असल्याचे फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन पदाधिकारी सुनील देशपांडे यांनी सांगितले. फेडरेशनच्या वतीने अवयवदानाच्या प्रचारासाठी राज्यात एकूण ३ हजार किमीची पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा ग्रामीण भागात सर्वाधिक होती. यातून ३५० जागरुकता कार्यक्रम करून ४० हजार लोकांपर्यंत जागरुकता पोहोचवली असल्याचंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यासाठी हे आनंदाचे वृत्त असले तरीही गरज आणि पुरवठा पाहता अवयवदानाबाबत जागरुकता वाढली पाहिजे. अवयवदानाची अजूनही गरज आहे. कारण, प्रतिक्षायादी ही वाढते आहे. त्यामुळे अवयवदान करणं गरजेचं आहे आणि त्याबाबतची माहिती असणं ही गरजेची आहे. – डॉ. साधना तायडे, राज्य आरोग्य संचालिका

अवयवदानाची २०१९ मधील आकडेवारी 

जिवंतपणी मूत्रपिंड प्रत्यारोपण  –  ३५१
जिवंतपणी यकृत प्रत्यारोपण   –  ७२
मृत्यूपश्चात मूत्रपिंड प्रत्यारोपण –  ७२
मृत्यूपश्चात यकृत प्रत्यारोपण – ४८
हृदय    – १४
फुप्फुस  –  २


हेही वाचा – तीन अपयशी शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -