Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : 2019 च्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील मतदानात...

Maharashtra Election 2024 : 2019 च्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील मतदानात वाढ

Subscribe

2019 ला विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी शहर जिल्ह्यातील 10 जागांसाठी 48.22 टक्के मतदान झाले होते. तर, उपनगर जिल्यातील 26 जागांसाठी 51.28 टक्के इतके मतदान झाले होते. या आकडेवारीवरून तुलनात्मक गणित केल्यास मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानात 4.43 टक्के तर उपनगर जिल्ह्यात 5.11 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

मुंबई : मुंबईत विधानसभेच्या 36 मतदारसंघात बुधवारी (20 नोव्हेंबर) सुरळीत मतदान पार पडले. यावेळी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी शहर जिल्ह्यातील 10 जागांसाठी 52.65 टक्के मतदान झाले आहे. तर, उपनगर जिल्यातील 26 जागांसाठी 56.39 टक्के इतके मतदान झाले आहे. दरम्यान, 2019 ला विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी शहर जिल्ह्यातील 10 जागांसाठी 48.22 टक्के मतदान झाले होते. तर, उपनगर जिल्यातील 26 जागांसाठी 51.28 टक्के इतके मतदान झाले होते. या आकडेवारीवरून तुलनात्मक गणित केल्यास मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानात 4.43 टक्के तर उपनगर जिल्ह्यात 5.11 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. (Increase in voting in Mumbai city and suburbs compared to 2019)

मुंबईत विधानसभेच्या 36 मतदारसंघात बुधवारी सुरळीत मतदान पार पडले. मात्र मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होण्यास तब्बल 24 तासांपेक्षाही जास्त कालावधी लागला. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, उमेदवार आणि मतदार हे अक्षरशः ताटकळत बसले होते. अखेर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सायंकाळी 6 नंतर शहर आणि उपनगर येथील मतदानाची अंतिम आकडेवारी हाती आली. तत्पूर्वी बुधवारी देण्यात आलेली आकडेवारी ही अंदाजित व बेभरवशाची होती.
निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतिम मतदानाच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 52.65 टक्के मतदान झाले आहे. तर, उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात 56.39 टक्के इतके मतदान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Exit Poll : आरक्षणाचा विषय गंभीर, तरीही मराठा-ओबीसीचा महायुतीला पाठिंबा; आकडे काय सांगतात?

36 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात जास्त मतदान हे पूर्व उपनगरातील भांडूप मतदारसंघात 62.88 टक्के इतके (1,81,279) आणि सर्वात कमी मतदान हे शहर भागातील कुलाबा मतदारसंघात 44.44 टक्के (1,17,890) इतके झाले आहे. तसेच, शहर भागात सर्वात जास्त मतदान हे माहिम मतदारसंघात 59.01 टक्के (1,33,343) तर उपनगर भागात सर्वात कमी मतदान हे वांद्रे (पश्चिम) मतदारसंघात 51.36 टक्के (1,48,304) झाले आहे.

- Advertisement -

मुंबईतील 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानात झालेल्या मतदार संघांवर नजर टाकली तर भांडूपमध्ये 62.88 टक्के, बोरिवलीत 62.32 टक्के आणि मुलुंड 61.42 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदार संघांवर नजर टाकल्यास कुलाबात 44.44 टक्के आणि मुंबादेवीमध्ये 48.70 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा – Exit Poll : राज्यात त्रिशंकू तर अपक्षांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री…; या एक्झिट पोलची चर्चा

50 ते 60 टक्के मतदान झालेले मतदारसंघ

  1. शहर जिल्ह्यातील मतदारसंघ
    धारावी – 50.03 टक्के
    सायन कोळीवाडा – 53.56 टक्के
    वडाळा – 57.67 टक्के
    माहिम – 59.01 टक्के
    वरळी – 53.53 टक्के
    शिवडी – 55.52 टक्के
    भायखळा – 53.02 टक्के
    मलबार हिल – 52.53 टक्के
  2. उपनगर जिल्ह्यातील मतदारसंघ
    दहिसर – 58.33 टक्के
    मागाठाणे – 59.35 टक्के
    विक्रोळी – 57.61 टक्के
    जोगेश्वरी – 59.16 टक्के
    दिंडोशी – 57.75 टक्के
    कांदिवली – 54.77 टक्के
    चारकोप – 57.76 टक्के
    मालाड – 54.89 टक्के
    गोरेगाव – 55.61 टक्के
    वर्सोवा – 51.44 टक्के
    अंधेरी (पश्चिम) – 53.67 टक्के
    अंधेरी (पूर्व) – 58.28 टक्के
    विलेपार्ले – 56.97 टक्के
    चांदिवली – 52.92 टक्के
    घाटकोपर (पश्चिम) – 59.99 टक्के
    घाटकोपर (पूर्व) – 59.58 टक्के
    मानखुर्द – 52.14 टक्के
    अणुशक्ती नगर – 54.04 टक्के
    चेंबूर – 54.97 टक्के
    कुर्ला – 53.15 टक्के
    कलिना – 52.68 टक्के
    वांद्रे (पूर्व) – 54.65 टक्के
    वांद्रे (पश्चिम) – 51.37 टक्के

हेही वाचा – Ajit Pawar : सुप्रिया सुळेंसाठीचा प्रचार अजित दादांना भोवणार; बारामती कोर्टाकडून उपमुख्यमंत्र्यांना समन्स


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -