दिलासादायक! पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विषेश म्हणजे मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात चांगली बॅटींग केल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबईनंतर आता पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या (Pune dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Gulabrao Patil Instructions to streamline water supply in 16 districts including Konkan and Western Maharashtra

मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विषेश म्हणजे मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात चांगली बॅटींग केल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबईनंतर आता पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या (Pune dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या धरणांच्या पाणीपातळीत जवळपास 1 टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत ते 5.45 टीएमसी इतके झाले आहे. (Increase in water supply from lakes supplying water to Punekar)

गुरूवारी संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार बॅटींग केली. पुण्यातही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पुण्यातील धरणांमध्ये गुरुवारी सकाळी 4.51 टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 5.45 टीएमसी झाला. मागील 24 तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात 55 मिमी, पानशेतमध्ये 60 मिमी, टेमघरमध्ये 81 मिमी आणि खडकवासलामध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत या भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी पाऊस असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत.

१० टक्के पाणीकपात रद्द

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा गेल्या १४ दिवसात १० टक्क्यावरून २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यावर समाधान व्यक्त करीत मुंबई महापालिकेने २७ जूनपासून लागू असलेली १० टक्के पाणीकपात ८ जुलैपासून रद्द केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन १० टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी २४ तासातच पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ; महाराष्ट्राच्या जनतेला बसणार आर्थिक फटका